मंगलवार, 27 नवंबर 2007

समांतर जगाचा जीवन मार्ग ....














.......... मानवाचे जीवन अनेक पैलू आसनारे...ह्या जीवन चा गलिचा अनेक रंगाने ,आकृतिने,
सजलेला ...!या जीवनाचे धागे देखील विविध ... जरतारी ,रेशमी ...अनेक पोत ...!पण काही
धागे आत लपलेले...!काही धाग्याना मात्र सदैव ..भरजरी चा मान....!पण काही धाग्याच्या वाटेला
मात्र नेहमीच आज्ञातवास ,..... जसे की हे समांतर जग..!
.............अनेक वेळा असेही होते , ज्याला "पुरुष "असे विशेषण दिले जाते किवा जिला "स्त्री "
असे mhntale जाते ,त्यांचे मानसिक जग मात्र त्यांच्या लिंगाशी विरोधाचे नाते किवा भेदाचे नाते
सांगते ,एक पुरुषाला अन्य पुरुषात आनंदाचा महामेघ दिसू लागतो,तेव्हा एक नव जग ,एक "जीवन मार्ग "आकाराला येतो ...!
सजातीय[समलिंग्गी]आकर्षण असणा-यांचे "हे"एक जीवन वास्तव आहे ,आपले ही एक जग आहे,आणि "या "आपल्या जगाची रीत ,संस्कृति ,विचार परंपरा,वागने,जीवन संघर्ष ,दैनंदिन
वास्तव याची नोंद आता झपाट्याने होत aahe ..सजातीय संबंधना एक दीर्घा इतिहास आहे ,प्राचीन
ता आहे,प्राचीन भारतीय परम्परेत जसे याचे अस्तित्व होते ,तसेच प्राचीन ग्रीक कलेत देखील ते दिसते...या जगाचे अनके पुरावे आपण देवू शकतो,rugvedaa मधे ही नोंद आहे, तशी ती मनुस्मृति
मधे ही दंडा संहितेत दिसते ,सोक्रेटिस-प्लेटो चे वास्तव सजातीय सम्ब्न्धांची दखल घेनारे अणि
त्यांची चर्चा करणारे होते ...स्त्री -पुरुशामाधिल लिंग्गिकसंबंध परस्परामाधिल ओढ़ ,आकर्षण
जितके नैसर्गिक तितकेच सजातीय प्रेम ,संबंध नैसर्गिक होते ......राहिल
प्राचीन आदिम शिल्पकलेत तील कामशिल्पे पहिली तर त्या मधे देखील सजातीय
सम्बंधंचे चित्रण दिसते...भिन्नालिंग्गी सम्बंधाकडे जितक्या सहजतेने पाहिले जात होते ,अगदी
तितक्याच सहजतेने सजातीय लोकन कड़े पाहिले जात होते..,या दाव्याला पुष्टि मिळते, अन्याथा
मंदिर सारख्या पवित्र अणि श्र्धेच्या ठिकाणी सजातीय कामशिल्पे का बरे लावली असती?
आज गे अणि" लेस्बी "करीता "आचल","स्त्री संगम " आणि गे करीता "समभावानिक"
हमसफ़र " इत्यादी संस्था अस्तिवात आहे...आपल्या जगातील लोकांचे भाव भावानाचे आविष्कार
आपल्या मानसिक समस्या जाणून घेउन आपल्याला त्यांच्या जगात प्रतिष्टा आणि सन्मान मिलून देण्यासाठी कार्य करीत आहे !.......आजमितिस गे, लिस्बी , Bi[द्वी-लिंग्गी] लोकांचे संख्यात्मक जाट वाढत आहे , आणि उद्याच्या जगाची एक रचना सुप्तपने घडत आहे...आर्थात आज ही "त्या "जगातील लोक या चा सांगोपांग विचार करण्या एवढे सम्जुत्दार नाही ....या बद्दल चर्चा तर सोडाच पण बोलन्यास देखील "त्या"जगातील लोक तयार नाहीत........!
....अशी समंजसता पाश्चिमात्यान मधे दिसते ...तिकडे ही सरलमार्गी लोकांची सत्ता आहेपण ,आपल्या कड़े सजातीय सम्बंधाना आणि अश्या लोकांना जितके अस्पृश्य ,विकृत,त्याज्य
मानले जाते ;तितके तिकडे मानले जात नाही ....आपल्या सजातीय विश्वात तील लोकां वर तिकडे मानस शास्त्रात दरोज प्रचंड ,आमाप संशोधन होत आहे,,,,मानसोपचार तज्ज्ञ ,समाज-आभ्यासी,
चित्रपट-कला ,साहित्य कला "या "विषयावर सर्वस्तरिया आभ्यास करीत आहे ....!या सम्बन्धी
सजातीय विश्व ला समर्पित अक्षरश: शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि दरोज त्यात भर पडत आहे
" सजातीय " जगाचे जीवन वास्तव प्रकाशात आन्यासाठी अणि "या"समांतर जगाला
समजून घेवून त्याना मुख्य प्रवाहात आणून, आदराचे प्रतिष्ठे चे स्थान देण्यासाठी सजातीय सम्बंधांचा इतिहास-वर्तमान्-भविष्यकाल घासून पुसून तपासला जात आहे ,आपल्याकडे असे होताना दिसत नाही ,,,,,आपल्या जगातील लोक इतके भित्राट अणि पोशाखी आहेत की, आपल्याच जगाकडे
डोळे सताड़ उघडे ठेवून पहानेच टालतो ......असे केल्याने आपण नेमके काय साध्य करणार ?......?
"या" जगाला गत कालाचा आदर आणि प्रतिष्टा परत मिलनार............?

मूल लेखक: विजय तापस
स्वैर समयोचित रूपांतर :आयुष प्रधान..

कोई टिप्पणी नहीं: