गुरुवार, 29 नवंबर 2007

चला दोस्ताहो..[सजातीय ]..आयुष्यावर बोलू काही.....

......आयुष्याचे अनके रंग !अनेक प्रकार !व्यक्ति तितक्या प्रवृति !...जरी थोडेसे भिन्नत्व तरी पण माणूस म्हणुन जगण्याची जिगीषा, ओढ़ ,संघर्ष सर्वत्र सारखाच !...कुणी निसर्गत: काही वेगले पण घेवून आलेले ...मात्र ते वेगले पण म्हणजे अपुर्नात्वा नव्हे ! थोडेसे अधिक सुक्ष्मपणे या समाजातील लोकां कड़े निरखुन बघितले तर तिकडे ही काही वर्ग दिसतात, str8 म्हणजे भिन्नालिंग्गी तत्वांशी एकनिष्ठ असना-या लोकांचा एक,सजातीय [Homo] वर्ग, द्वि-लिंग्गी गट[Bi],आणि तृतीयपंथी गट ,ही सारी माणसेच .......!
मात्र आज या जगावर निरंकुश सत्ता आहे ती सरलमार्गी लोकांची ...!या लोकांना जे स्विकारनिया वाटते,जे जे नैतिक वाटते ,आणि जे जे म्हणुन योग्य वाटते , ते सर्वानिच स्विकारले पाहिजे ,,अशी त्यांचा आग्रह ....मग हा आग्रह आम्हाला जाचक दुराग्रह वाटतो यात आमची ती काय चुक ....?ते आम्हाला समजून घेवु शकणार नाही,हे एक वेळ आम्ही मान्य करतो पण त्यांच्या जगातील आमचे अस्तिव नाकारावे ही भाषा आरेरावेची नह्वे काय ...?
सजातीय आकर्षण चे जग हे आज तुलनेने अत्यल्प असले तरी हे जगाचे वास्तव आहे,हे वास्तव सरलमार्गी जगाला अगदी खेटून chitkoon आहे,म्हनुनाच आमचे जग समान्तर आहे ,शाश्वत आहे ,,१९९७ मधे सजातीय ,Bi ,आणि लेस्बी लोकांचे पहिल सम्भेलन पार पडले ,,आमच्या जगातील लोकांची संख्या आज जर पाहिली तर आम्हाला कुणी आप्लसंख्यांक म्हनाणार नाही .....!आज मितिस लेस्बी अणि गे वेबसाइट ची संख्या आडोतीस लाख पन्नास हजार च्या वर आहे,ह्या site आणि आजचा ओरकुट चा navaa अवातर हे ज्या च्या शी संबंधित आहे ,अश्या सदस्यांची संख्या प्र्य्ताक्क्षात किती आसेल? हे वास्तव नाकारता येइल ....?
मूल लेखक:विजय तापस ,
स्वैर रूपांतर : आयुष प्रधान ..

कोई टिप्पणी नहीं: